अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्येने असतात !
ठाणे – २० टन साखर दान करायची आहे, असे सांगून साखर घेऊन नंतर पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी एका धर्मांधास नवघर पोलिसांनी अटक केली आहे, तर खोटे नाव सांगून साखर घेणारा त्याचा सहकारी पसार झाला आहे. (कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही, असे म्हटल्याच चूक ते काय ? – संपादक)
आरोपीने दिनेश बी. शाह असे नाव सांगून व्यापार्याकडून ६ लाख ५९ सहस्र रुपये इतक्या किंमतीची २० टन साखर घेतली आणि त्यांची फसवणूक केली. अन्वेषणात तुषार बाबुभाई लुहार यांनीच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले आहे. त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद याच्या सहकार्याने हा गुन्हा केला. पोलिसांनी रईस याला अटक केल्यावर त्याने फसवणूक करून मिळवलेली ४०० गोणी साखर नयानगरमधील अनमोल ट्रेडिंग आस्थापन येथे ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी तेथून साखरेचा साठा जप्त केला आहे, तर तुषार याचा पोलीस शोध घेत आहेत.