देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगाव (कर्नाटक) येथे उद्घाटन

ऑक्सिजन बस

बेळगाव – देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन बस’चे बेळगावचे जिल्हाधिकारी एम्.जी. हिरेमठ यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाच्या आवारात उद्घाटन करण्यात आले. यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणार्‍या कोरोना रुग्णांना त्वरित ऑक्सिजन मिळणे शक्य होणार आहे. प्रवासी बसमध्येच ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करून ‘मोबाईल ऑक्सिजन बस’ सिद्ध करण्यात आली आहे. या बसमध्ये ठराविक अंतर सोडून ऑक्सिजन सिलिंडर बसवण्यात आले आहेत.

गृहविलगीकरणात असलेल्या अथवा खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास ही ऑक्सिजन बस तेथे पोचणार असून रुग्णाला त्वरित ऑक्सिजन मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे.