साधना शिकवून साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त करणारी आणि संत बनवणारी सनातन संस्था
२३.४.२०२१ या दिवशी पू. माधव साठे यांनी देहत्याग केला. त्या निमित्ताने कल्याण येथील जिज्ञासू आणि धर्मप्रेमीयांना पू. साठेकाका यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् त्यांना शिकायला मिळालेली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिलीआहेत.
(भाग ५)
१. श्री. गिरीशभाई धोकीया, कल्याण
१ अ. स्वतः रुग्णालयात भरती असतांना आणि पत्नीचे नुकतेच देहावसान झाले असतांना स्थिरपणे बोलणारे पू. साठेकाका ! : ‘पू. साठेकाकांनी देहत्याग केला’, हे ऐकून मी एक मिनिट स्तब्धच झालो. त्यानंतर ‘१० – १२ दिवसांपूर्वीच सौ. साठेकाकूही देवाघरी गेल्या’, असे मला समजले. ‘ही वार्ता ऐकून माझी आणि माझ्या कुटुंबाची काय स्थिती झाली ?’, ते मी वर्णन करू शकत नाही. पू. साठेकाका स्वतः रुग्णालयात भरती असतांना आणि पत्नी नुकतीच निवर्तली असतांनाही पू. काकांचे न चुकता आम्हाला भ्रमणभाष यायचे. ‘लिंक पाठवली आहे. ‘ऑनलाईन’ जोडायला जमेल ना ? ‘अमुक एक’कार्यक्रम आहे. उद्योजक शिबिर आहे, दैनिक ‘सनातन प्रभात’ येतो ना ? काही अडचण नाही ना ?’, असेही त्यांनी मला विचारले; पण काकूंचे निधन झाल्याचे त्यांनी एका शब्दानेही आम्हाला सांगितले नाही किंवा तसे काही समजूही दिले नाही.
१ आ. उत्साहाने आणि निर्मळतेने सेवाकार्य करणे : पू. साठेकाकांचा संपर्क आणि सहवास फार उत्साहवर्धक होता. त्यांचे मन नेहमी शांत असायचे. मला त्यांच्या तोंडवळ्यावर शांती आणि तेज दिसून यायचे. पू. साठेकाकांकडून ‘थकवा येतो’ किंवा ‘कंटाळा आला’, असे कधीच ऐकायला मिळाले नाही. ‘निर्मळ झरा वहावा’, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे धार्मिक आणि सामाजिक कार्य केले.
१ इ. तळमळीने सेवा करणे : कुठलाही कार्यक्रम असेल, तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि योग्य नियोजन करून ‘कार्यक्रम चांगला कसा होईल ?’, हे ते पहायचे. ‘आपल्या कार्यक्रमाचा उद्देश सर्वांपर्यंत पोचावा आणि आपली सेवा घडावी’, अशी त्यांना तळमळ असायची. त्यांना कुठलाही लोभ किंवा कसलीही अपेक्षा नव्हती. केवळ एकच ध्येय होते, ‘धर्मप्रेमींना धर्म समजावणे !’ त्यामुळे साधना, नामजप, शिबिर आदी उपक्रम उत्साहात साजरा करतांना त्यांचा आनंद द्विगुणित व्हायचा.
१ ई. पू. साठेकाकांनी साधना करवून घेतल्यामुळे अनेक संकटांतून बाहेर पडता येणे : पू. साठेकाकांनी खर्या अर्थाने मला साधना सांगून नामजप करायला शिकवला. त्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. आताची दळणवळण बंदी आणि विषम परिस्थिती यांमध्ये सकारात्मक ऊर्जेच्या निर्माण कार्यासाठी पू. साठेकाकांनी मला नामजप अन् साधना यांसाठी प्रवृत्त केले. त्यामुळे आम्ही बर्याच संकटातून बाहेर पडलो.
२. श्री. यतीन शुक्ल, वाचक, उद्योजक, कल्याण.
२ अ. पू. साठेकाकांनी सनातन संस्थेची माहिती सांगितल्यावर आरंभी मनात नकारात्मक विचार येणे : ‘दोन वर्षांपूर्वी पू. साठेकाका त्यांचे मित्र डॉ. डहाके यांच्या समवेत आमच्या घरी आले होते. त्यांनी मला सनातन संस्थेविषयी माहिती सांगितली. मी कट्टर हिंदु आहे; पण क्रियाशील नाही. त्यामुळे मला आरंभी पू. साठेकाकां विषयी थोडी नकारात्मकता वाटली.
२ आ. पू. साठेकाका बोलत असतांना त्यांचे मन निर्मळ असून केवळ ‘श्री गुरूंनी दिलेले ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याची तळमळआहे’, असे जाणवणे : त्यांनी माझ्याशी संवाद साधायला आरंभ केल्यावर मला त्यांच्या आवाजात खरेपणा वाटला आणि ‘ते मनाने फार निर्मळ आहेत’, असे मला जाणवले. ‘मला माझ्या गुरूंकडून जे ज्ञान मिळाले, ते सर्वांना द्यावे आणि सर्वांचे जीवन सकारात्मक व्हावे’, अशी त्यांची फार तळमळ होती. ते स्वतः सकारात्मक जीवन जगत होते.
२ इ. पू. साठेकाकांनी परिवारासाठी सत्संगाचे आयोजन करणे, त्यांच्या मार्गदर्शनानुसार कृती केल्यावर त्याचा पुष्कळ लाभहोणे : त्यानंतर पू. साठेकाकांनी आमच्या घरी येऊन आम्हाला सांगितले, ‘‘मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचे आहे आणि त्यासाठी मला तुमच्या परिवारासाठी एका सत्संगाचे आयोजन करायचे आहे.’’ एक दिवस पू. साठेकाका त्यांची मुलगी सौ. प्राची यांच्या समवेत आमच्या घरी आले. तेव्हा आमच्या घरी माझे कुटुंबीय आणि माझे काही मित्रही होते. पू. साठेकाकांनी बोलायला आरंभ केल्यावर मला जाणवले, ‘मी माझ्या पूर्वजांसाठी अद्याप काहीही केले नाही.’ त्यानंतर मी पू. काकांच्या मार्गदर्शनानुसार कृती करायला आरंभ केला आणि खरोखरच त्याचा मला पुष्कळ सकारात्मक लाभ झाला. त्यामुळे आता पू. साठेकाका सांगतात, त्याप्रमाणे मी कृती करतो.
२ ई. कृतज्ञता : ‘मला पू. साठेकाकांचा सहवास मिळाला’; म्हणून मी पुष्कळ आनंदी आहे. त्यासाठी मी देवाचरणी कृतज्ञता व्यक्त करतो. पू. साठेकाका देवाच्या चरणी लीन झाले; पण ‘ते आजही आपल्याला पहात असतील’, असे मला वाटते.’
३. जिज्ञासू, वाचक, हितचिंतक आदींचाही आधार बनलेले पू. माधव साठे, म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पितृतुल्य साधक !
पू. माधव साठे यांचे वय ७५ वर्र्षे होते. एवढे वयस्कर असूनही ते पूर्णपणे झोकून देऊन आणि तळमळीने सेवा करायचे. ते अनेक जिज्ञासूंना संपर्क करायचे. त्यांचे संपर्क एवढे प्रभावी असायचे की, समाजातील जिज्ञासू, ‘सनातन प्रभात’चे वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक यांनी साधनेला आरंभ केला. पू. साठेकाका त्यांचे आधारस्तंभ झाले होते. पू. काकांच्या निधनानंतर मी काही जिज्ञासूंना संपर्क केला. तेव्हा त्यांनी पू. साठेकाकांविषयी काढलेले उद्गार येथे दिले आहेत. – श्री. विनोदपालन, ठाणे
३ अ. श्री. प्रदीप अंचन, ठाणे
३ अ १. पू. साठेकाकांशी जवळीक होणे आणि त्यांच्या सेवेचे कौतुक वाटणे : ‘पू. साठेकाकांनी देहत्याग केल्याचे कळल्यावरमला धक्का बसला. माझी पू. काकांशी फार जवळीक झाली होती. मागील २ – ३ वर्षांपासूनच माझा त्यांच्याशी संपर्क आला. त्यांचे बोलणेही हळू (मृदू) असायचे. ते नेहमी मला समजून घेऊन बोलायचे. पू. साठेकाका सेवेसाठी पुष्कळ वेळ द्यायचे. यावयातही ते फार सक्रीय होते. ते नेहमी वेळेत मला कार्यक्रमांची आठवण करून द्यायचे. मागील आठवड्यात त्यांनी मला संपर्क केला; परंतु त्या वेळी त्यांना नीट बोलता येत नव्हते; म्हणून त्यांनी मला कार्यक्रमाची ‘पोस्ट’ पाठवली होती. मी तो कार्यक्रम पाहिल्याचे त्यांना कळवलेही होते. त्यांचे व्यक्तीमत्त्व हिर्यासारखे होते.’
३ आ. श्री. विवेक सोनावणे, ठाणे
३ आ १. प्रत्येक वेळी साधनेची नवीन सूत्रे सांगून साधनेच्या मार्गावर बोट धरून चालवणार्या पू. साठेकाकांचे निधनझाल्यामुळे ‘त्यांचे धरलेले बोट मध्येच सुटले’, असे वाटणे : ‘शनिवारी उद्योगपती वार्तालाप असतो. त्यासाठी पू. साठेकाका मला सकाळी भ्रमणभाष करायचे. त्यांच्या भ्रमणभाषची मी वाट पहात होतो. त्यांच्यामुळेच मी सनातन संस्थेशी बांधला गेलो.
पू. साठेकाका माझ्याकडून सगळे करवून घ्यायचे. मला भ्रमणभाष केल्यावर प्रत्येक वेळी ते मला नवीन सूत्रे सांगायचे. आता‘मी अध्यात्मात पोरका झालो’, असे वाटते. सद्गुरूंपर्यंत आपण पोचू शकत नाही; परंतु पू. साठेकाका तो मार्ग दाखवत होते. मी त्यांचे बोट धरून चाललो होतो; पण ‘मार्गात ते बोट मध्येच सुटले’, असे मला वाटले. त्यामुळे पू. काकांची उणीव मला जाणवत आहे.’
३ इ. सौ. नीरजा मिश्रा, ठाणे
३ इ १. मुळात मनात असलेले साधनेचे बीज पू. साठेकाकांशी आलेल्या संपर्कामुळे जागृत होणे : ‘पू. साठेकाकांनी ते रुग्णालयात असतांनाही मला संपर्क केला होता. तेव्हा त्यांच्याशी माझे बोलणे झाले होते. माझी आई देवीची उपासक होती आणि तिने उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली होती. त्यामुळे माझ्यात साधनेचे बीज होते. मी भक्ती म्हणून काही सेवा केल्या; पण मी अध्यात्माकडे उशिरा वळले. अनेक वर्षांनी पू. साठेकाका माझ्या संपर्कात आले आणि त्यांच्या माध्यमातून मी पुन्हा अध्यात्माकडे वळले.’
(समाप्त)