पुणे, २९ एप्रिल – कोरोनामुळे राज्यात १ एप्रिलपासून अनेक निर्बंध लागू केले. दळणवळण बंदी केली. त्यामुळे उत्तर भारतीय लोक त्यांच्या मूळ गावी रेल्वेने मोठ्या प्रमाणात रवाना होत आहेत. आतापर्यंत अडीच लाख नागरिक, त्यात प्रामुख्याने कामगार, त्यांच्या कुटुंबियांसह गावी गेले असून या मासापर्यंत आणखी १५ अतिरिक्त गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती पुणे रेल्वेकडून दिली आहे.
पुणे स्थानकातून जम्मू तावी झेलम एक्सप्रेस, आझाद हिंदू, गोरखपूर, दामापूर, मंडुअडिहा या ठिकाणी प्रतिदिन गाडी सोडण्यात येत आहे. याशिवाय बिहार, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यात जाणार्यांची संख्याही अधिक आहे. त्यानुसार गाड्यांचे नियोजन केले जात आहे. या सर्व गाड्या आरक्षणाच्या आहेत. प्रवाशांनी विनाकारण स्थानकावर गर्दी करू नये. केवळ तिकिट धारकांनीच प्रवासापूर्वी ९० मिनिटे आधी स्थानकावर यावे, असे आवाहन पुणे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी केले आहे.