हरिद्वार, २५ एप्रिल (वार्ता.) – राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जसे धर्माचरणाचे महत्त्व विशद करण्यात आले आहे, त्यानुसार आम्हीही आपल्या वैदिक धर्माचा, यज्ञ अन् गायत्री मंत्र यांचा प्रसार करतो. आपण प्रदर्शनाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे हिंदु संस्कृती आणि धमार्र्चरण यांची आवश्यकता पटवून दिली आहे. सध्या समाजात धर्मप्रसाराची पुष्कळ आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कच्छ येथील देवी श्री विद्यानंद सरस्वती (आदिशक्ति गुरु माँ) यांनी केले. येथील कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने लावण्यात आलेल्या ‘सनातन धर्मशिक्षण अन् हिंदु राष्ट्र-जागृती केंद्रा’ला भेट दिल्यावर त्या मार्गदर्शन करत होत्या. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांना सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याविषयी माहिती दिली.