हिंदु जनजागृती समितीच्या निःस्वार्थ सेवेविषयी विकल्प पसरवण्याचा अयशस्वी प्रयत्न !

हिंदु धर्मजागृती सभेत भाषण देण्यासाठी अवास्तव मानधन मागणारे कथित हिंदुत्वनिष्ठ वक्ते आणि त्यांचे समन्वयक यांच्याविषयी आलेला कटू अनुभव !

श्री. रमेश शिंदे

‘एका राज्यातील एका गावात एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेने हिंदु धर्मजागृती करण्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते. आयोजकांनी या सभेला वक्ता म्हणून हिंदुत्वाविषयी व्याख्याने देणारी एक प्रसिद्ध व्यक्ती आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अशा २ जणांना आमंत्रित करण्याचे ठरवले होते.

आयोजकांनी हिंदुत्वाविषयी व्याख्यान देणार्‍या प्रसिद्ध वक्त्यांना संपर्क साधला असता त्यांच्या कार्यक्रमांचा समन्वय पहाणार्‍या व्यक्तीने वक्त्यांनी सभेत भाषण करण्यासाठी ५१ सहस्र रुपये मानधनाची मागणी केली. यावर आयोजक संघटनेने २१ सहस्र रुपये देण्याची सिद्धता दर्शवली; पण त्यासाठी संबंधित वक्त्यांची सिद्धता नव्हती. त्यामुळे आयोजकांनी त्या वक्त्यांना न बोलावता एका सभागृहात ३००-४०० जणांच्या उपस्थितीत सभा घेण्याचे ठरवले.

आयोजकांनी प्रसिद्ध वक्त्यांच्या कार्यक्रमांचा समन्वय पहाणार्‍या व्यक्तीला ‘हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्याने कार्यक्रमात विषय मांडण्यासाठी कशाचीही (मानधनाची) मागणी केलेली नाही’, असे सांगितले. तेव्हा प्रसिद्ध वक्त्यांच्या समन्वयकांनी समितीविषयी  ‘त्यांची संस्था मोठी आहे. त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या चालतात’, अशा प्रकारचे उत्तर आयोेजकांना दिले. अशा प्रकारे वक्ता समन्वयकांनी हिंदु जनजागृती समितीविषयी चुकीची माहिती प्रसारित करून विकल्प पसरवण्याचा प्रयत्न केला.

या प्रसंगानंतर सभेच्या आयोजकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडे संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी सुप्रसिद्ध वक्त्यांच्या मानधनाविषयी आग्रही भूमिका घेण्याविषयी पुढील भावना व्यक्त केली, ‘या व्यक्ती सनातन धर्माचा प्रचार करत आहेत कि हिंदूंना लुटत आहेत ? आम्ही सभा स्वतःसाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी घेत नाही, तर समाजाला जागृत करण्यासाठी आयोजित करत आहोत. पैशांना सर्वस्व मानणार्‍या या व्यक्तींच्या अनुभवातून वाटले की, भारत हिंदु राष्ट्र नाही, तर इस्लामी राष्ट्र बनेल; कारण मौलाना-मुसलमान त्यांच्या धर्माचा निःशुल्क प्रचार करतात.’

या प्रसंगाच्या संदर्भाने खालील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.

१. हिंदुत्वाच्या क्षेत्रात व्यावसायिक हेतूने केलेली व्याख्याने जरी आवेशपूर्ण वाटली, तरी वक्त्याची धर्मजागृतीची तळमळ आणि सेवाभाव अल्प असल्याने त्यातून श्रोत्यांवर अपेक्षित असा परिणाम साधला जात नाही. स्वामी विवेकानंद सनातन धर्माचे पालन करत असल्याने त्यांनी केवळ ‘माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो….’ एवढे म्हटल्यावरच विदेशी श्रोत्यांची मने जिंकली गेली. यातून भाषणाच्या शैलीपेक्षाही वक्त्याची साधना आणि धर्माचरण अधिक महत्त्वाचे असते, हे लक्षात येते. याच मार्गावर हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.

२. हिंदु धर्मजागृती सभेत विषय मांडण्यासाठी अवास्तव मानधन मागणार्‍यांनी निःस्वार्थपणे अन् सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीविषयी ‘त्यांना परवडते; कारण त्यांच्या मोठमोठ्या कंपन्या चालतात’, असे चुकीचे वक्तव्य करणे म्हणजे स्वतःची अपप्रवृत्ती लपवण्यासाठी इतरांच्या चांगुलपणावर शिंतोडे उडवण्यासारखे आहे. हिंदु जनजागृती समितीविषयी असणारी ही द्वेषभावना नव्हे का ? धादांत खोटे बोलणार्‍या व्यक्ती हिंदुत्वाचे कार्य प्रामाणिकपणे करू शकतील का ?

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आपल्या क्षेत्रातही हिंदु जनजागृती समितीविषयी अशा प्रकारे कुणी विकल्प पसरवत असल्याचे लक्षात आल्यास अथवा हिंदुत्वाच्या क्षेत्रात कटू अनुभव आल्यास आम्हाला कळवा.

टपालाचा पत्ता : हिंदु जनजागृती समिती, मधु स्मृती, बैठक सभागृह, घर क्रमांक ४५७, सत्यनारायण मंदिराजवळ, ढवळी, फोंडा, गोवा – ४०३४०१

संगणकीय पत्ता : [email protected]