धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्य ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधिज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

महाराष्ट्रातील सरकारीकरण झालेल्या अनेक मोठ्या मंदिरांतील घोटाळे उघड करण्याचे कार्य हिंदु विधिज्ञ परिषदेने केले आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणार्‍या ३ सहस्र २०० हून अधिक देवस्थानांतील विविध घोटाळे समोर आणले आणि त्याविषयी न्यायालयीन लढा दिला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील पवित्र माणिकर्णिका कुंडावर शौचालय बांधले, देवीला रासायनिक लेपन करण्यात आले, नैमित्तिक पूजा-पाठ यांत पालट केले गेले, देवीचे सोन्या-चांदीचे दागिने वितळवण्यात आले. याविरोधात जनआंदोलन उभे केले. याचे फलित म्हणून आज मणिकर्णिका कुंडावरील शौचालय हटवून त्याचे पुन्हा उत्खनन करण्यात येत आहे. सरकारच्या कचाट्यातून मंदिरांची सुटका करून ती भाविकांच्या कह्यात देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. धर्मद्रोही शासकीय समित्या हटवणे, हे धर्मकर्तव्यच आहे.