रामनाथी आश्रमात येतांना प्रवासात कुलदेवी श्री भवानीदेवीचा नामजप होणे आणि आश्रमात प्रवेश करतांना ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप आपोआप चालू होणे

 

रामनाथी आश्रम

‘मी रामनाथी आश्रमात जात असतांना संपूर्ण प्रवासात कुलदेवी श्री भवानीदेवीचा नामजप करत होतो. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून चारचाकीने आत प्रवेश करतांना ‘माझा कुलदेवीचा नामजप बंद होऊन ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप चालू झाला’, हे आश्रमात काही अंतर चालून गेल्यावर माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘मी एखाद्या भगवान शिवाच्या तीर्थक्षेत्री आहे’, असे मला वाटत होते. दुसर्‍या दिवशी मी आश्रम पहातांना आश्रमात ३ ठिकाणी श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने दिलेला संदेशरूपी आशीर्वाद आणि शिवपिंडीचे चित्र पाहिल्यावर ‘काल माझा नामजप का पालटला ?’, ते मला समजले.’

– श्री. गणेश मुरलीधर बुचडे, पलूस, सांगली. (१२.३.२०२०)

 या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक