तामकणे (जिल्हा सातारा) येथील बौद्ध लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !

बौद्ध लेणी

सातारा – सध्या कोरोना महामारीमुळे राज्यावर दळणवळण बंदीचे सावट आहे; परंतु काही ठिकाणी नागरिक अत्यंत निष्काळजीपणाने वागत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष करत पाटण तालुक्यातील तामकणे येथील बौद्ध लेणी परिसरात समता सैनिक दलाच्या वतीने फाल्गुन पौर्णिमेनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी समता सैनिक दलाच्या वतीने बौद्ध स्तुपाला मानवंदना देऊन गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी बौद्ध वास्तूंचे संवर्धन, ऐतिहासिक महत्त्व या विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. नंतर भीमबुद्ध गीतांचा कार्यक्रम पार पडला. दुपारी खीरदान (भंडारा) कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १०० ते १५० जण उपस्थित होते.