आज भावपर्व (टीप १) सोनियाचे,
अनुभवले भावविश्व सर्व युगांचे ।
कसे होऊ उतराई आम्ही श्रीरामकृष्णस्वरूप श्री गुरूंचे ॥ १ ॥
प्रत्येक युगाची भावभेट देती आम्हा श्रीसत्शक्ति बिंदाई (टीप २) ।
श्रीराम – हनुमंत भेटीच्या भावभक्तीचा
मिलाप घडवला आम्हासी ॥ २ ॥
द्वापरयुगी श्रीकृष्ण-अर्जुन आणि त्रेतायुगी श्रीराम अन् हनुमंत ।
तसेच कलियुगी असती श्रीरामकृष्णरूप
श्री गुरु आणि सद्गुरु अन् संत ॥ ३ ॥
भावसत्संगातूनी भावविश्व अनुभवण्या आम्हा दिले ।
एक क्षण कलियुगी जणू ब्रह्मांडच स्थिरावले ॥ ४ ॥
नसे भान आम्हा जिवांना कुठे आहोत आम्ही ।
माता बिंदाईने उलगडले रहस्य,
‘श्री गुरु श्रीरामकृष्णच आहात तुम्ही’ ॥ ५ ॥
कलियुग असूनही त्रेता अन् द्वापर युग अनुभवले ।
क्षणभर कधी मी मर्कट, तर कधी पर्वतासम भासले ॥ ६ ॥
मेळा तो भक्त-भगवंत भेटीचा, गुरुकृपेचा अन् भावभक्तीचा ।
जयजयकार करतो आम्ही भक्तवत्सल
भगवंत अन् श्री हनुमंत प्रभूंचा ॥ ७ ॥
ज्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदामाईंनी आज या युगांचे दर्शन घडवले । साष्टांग दंडवत त्यांना भावविभोर आम्हा केले ॥ ८ ॥
टीप १ : प्रत्येक गुरुवारी होणारा भावसत्संग
टीप २ : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ
– सौ. सुनीता पंचाक्षरी, अंबाजोगाई (९.४.२०२०)