अटकपूर्व जामिनासाठी सचिन वाझे यांचा न्यायालयात अर्ज

मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. १९ मार्च या दिवशी अर्जावर सुनावणी होईल. या प्रकरणात वाझे संशयित आहेत. वाझे यांचे गुन्हे अन्वेषण शाखेतून नागरी सुविधा केंद्रात स्थानांतर करण्यात आले आहे.