वैधानिक विकास महामंडळांवरून सुधीर मुनगंटीवार यांची हक्कभंगाची मागणी !

मुंबई – वर्ष १९५६ च्या कायद्यानुसार विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्र यांसाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. ३० एप्रिल २०२० या दिवशी या वैधानिक विकास मंडळांचा कालावधी संपल्यानंतर ती मंडळे स्थापन करण्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्‍वासन दिले होते. हे आश्‍वासन न पाळल्याने त्यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्‍वासन पाळले नाही, हा विधानसभेच्या सार्वभौम सभागृहाच्या विशेषाधिकाराचा भंग आहे. त्यामुळे विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ आणि नियोजनमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची सूचना मांडली. ही सूचना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी हक्कभंग समितीकडे पाठवली.