प्रतापगड (उत्तरप्रदेश) येथे वादातून धर्मांधांकडून ११ वर्षीय हिंदु मुलाची हत्या

उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांचे असे धाडस कसे होते ?

दीपक नावाच्या मुलाची नाल्यात बुडवून हत्या

प्रतापगड (उत्तरप्रदेश) – येथे धर्मांधांनी ११ वर्षांच्या दीपक नावाच्या मुलाची नाल्यात बुडवून हत्या केली. जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत दीपकला पाण्यात बुडवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी तिघा धर्मांधांना अटक केली आहे.

१. दीपकच्या आईने सांगितले की, मोहल्ल्यातील दिलशाद, त्याचा भाऊ नाटे आणि अन्य एक मुलगा त्यांच्या घराच्या खिडकीवर दगड मारत होते. त्याला विरोध केल्यावर मुलांनी धमकी दिली होती. यानंतर दीपकची हत्या झाली.

२. पोलिसांनी सांगितले की, खिडकीवर दगड मारल्यानंतर तडजोड होऊन दीपकच्या वडिलांना २०० रुपये देण्यात आले होते. त्या पैशांतून ते रात्री मद्य पिऊन आले आणि पोलिसांत तक्रार करणार असल्याची धमकी दिलशादच्या कुटुंबाला दिली. दोन दिवसांनी दिलशाद याने दीपक याला नाल्याजवळ पाहिल्यावर त्याच्या मित्रांच्या साहाय्याने त्याला मारहाण केली आणि नाल्यात बुडवले.