काळ्या रंगाच्या वस्तू परिधान केल्यामुळे व्यक्तींवर होणारे आध्यात्मिक दुष्परिणाम !

‘काळा रंग तमप्रधान आहे. त्यामुळे काळ्या रंगातून तामसिक स्पंदने वातावरणात पसरून सूक्ष्म स्तरावर वातावरण दूषित होते. काळ्या रंगाकडे वाईट शक्तीही आकृष्ट होतात. त्यामुळे काळ्या रंगाचे बूट, कोट, साडी, टाय किंवा टोपी धारण केल्यामुळे व्यक्तीच्या भोवती त्रासदायक शक्तीचे आवरण निर्माण होते आणि तिला वाईट शक्तींचा त्रासही होऊ शकतो. काळ्या रंगाकडे सगुण-निर्गुण स्तरावरील त्रासदायक काळी शक्ती आकृष्ट झाल्यामुळे व्यक्तीचे शरीर, मन, बुद्धी आणि अहं यांवर त्रासदायक काळे आवरण निर्माण होऊन त्याच्यावर  नियंत्रण मिळवणे वाईट शक्तींना सोपे जाते. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू धारण केल्यामुळे व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास अधिक प्रमाणात होतो.     

१. काळ्या रंगाची वस्तू, त्यांचा विविध अवयव आणि कुंडलिनीचक्र यांवर होणारा दुष्परिणाम अन् दुष्परिणामांचे स्वरूप

२. आध्यात्मिक पातळीनुसार काळ्या रंगाच्या वस्तूंचा होणार्‍या दुष्परिणामांचे प्रमाण आणि हा दुष्परिणाम दूर करण्यासाठी व्यय होणार्‍या साधनेचा कालावधी

कु. मधुरा भोसले

३. निष्कर्ष

अ. इतर रंगांच्या तुलनेत काळा रंग सर्वांत तमोगुणी असल्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तूंमुळे सर्वाधिक प्रमाणात आध्यात्मिक हानी आणि त्रास होतो.

आ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी वाढल्यावर तिच्यावरील काळ्या रंगाच्या वस्तूंच्या दुष्परिणामांचे प्रमाण न्यून होते. यावरून साधना करून आध्यात्मिक पातळी वाढवण्याचे महत्त्व लक्षात येते.

इ. प.पू. भक्तराज महाराजांसारख्या परात्पर गुरूंची सात्त्विकता आणि चैतन्य इतके अधिक होते की, त्यांनी काळी टोपी किंवा काळा कोट परिधान केला, तरी त्यांच्यावर काळ्या रंगाचा कोणताच दुष्परिणाम होत नसे. या उलट त्यांनी परिधान केलेल्या वस्तूंवर त्यांच्यातील चैतन्याचा परिणाम होऊन त्यांनी वापरलेली काळी टोपी किंवा काळा कोट यांच्यातील तमोगुणी स्पंदने नष्ट होऊन त्यांच्यामध्ये सात्त्विकता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असे.

ई. काळ्या रंगाच्या अगदी विरुद्ध रंग पांढरा आहे. त्यामुळे पांढर्‍या रंगाच्या वस्तू परिधान केल्यामुळे व्यक्तींची सात्त्विकता, सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य यांचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढते, तसेच त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षणही होते.

वरील सूत्रांवरून हे सुस्पष्ट होते की, व्यक्तींनी काळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करणे शक्यतो टाळावे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.६.२०२०, रात्री १०.४५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक