१. सौ. सुजाता वी. कल्याणी, सांगली
अ. ‘देवद आश्रमात प्रवेश केल्यावर माझे मन शांत झाले. मला आश्रमात पुष्कळ शांतता आणि प्रसन्नता जाणवली.
आ. साधकांनी ‘साधना केल्याने आनंद कसा मिळतो ?’, हे सांगितल्यावर मला साधना करण्याची प्रेरणा मिळाली.
इ. मला नामजपाला आरंभ करण्यास प्रोत्साहन मिळाले.
ई. आश्रमाचे व्यवस्थापन पाहिल्यावर त्याचे वर्णन करण्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. आश्रम पाहून माझे मन भारावून गेले.’
२. सौ. सुनीता खोत, सांगली
अ. ‘देवद आश्रमातील प्रत्येक साधकाचा सेवाभाव पुष्कळ उच्च आहे.
आ. मला आश्रमाच्या परिसरात सकारात्मक ऊर्जा जाणवली.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १०.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |