दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास  ५०० रुपये दंड

कोल्हापूर – यापुढील काळात दुचाकी वाहनांना आरसा नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कागदपत्रे, विमा पॉलिसीसह वाहनांना आरसे बंधनकारक आहेत. सध्या वाहनांच्या संख्येत विक्रमी संख्येने वाढ होत आहे. महाविद्यालयीन तरुण गाडी चांगली दिसावी म्हणून आरसा काढून टाकतात. अशांना आता लगाम बसणार आहे. विना विमापॉलिसी वाहन चालवल्यास चालक आणि मालक अशा दोघांसाठी प्रत्येक २ सहस्र रुपये दंड आकारण्यात येत आहे. जिल्ह्यात दुचाकींची संख्या साधारणत: १२ लाख असून प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आता कडक कारवाई करण्यात येत आहे.