१. आश्रमदर्शन करतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘वैकुंठलोकाचे (रामनाथी आश्रमाचे) दर्शन घेतांना मला जाणवले, ‘येथील लाद्यांमध्ये कंपने होऊन त्या हलत आहेत.’
आ. ‘मी साक्षात् विष्णुलोकात आहे’, असे मला वाटले.
इ. आश्रमदर्शन करतांना ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत असून ते स्वतःच आम्हाला आश्रम दाखवत आहेत’, असे मला जाणवत होते. मला जिकडे-तिकडे प.पू. गुरुदेवच दिसत होते.
२. ध्यानमंदिरात आलेली अनुभूती
मी ध्यानमंदिरात गेलो असता श्री भवानीदेवीची मूर्ती पाहून मला जाणवले, ‘मी गेल्या जन्मी या देवीची पुष्कळ उपासना केली आहे.’ प्रार्थना केल्यानंतर ‘या देवीने आम्हाला प.पू. गुरुदेवांना गुरुरूपात दिले आहे’, याविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’
– श्री. चंद्रशेखर सिंह, वाराणसी (२७.६.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |