वैयक्तिक वापरासाठी विकत घेतलेली नवीन वस्तू वापरण्यापूर्वी तिची आध्यात्मिक स्तरावरील शुद्धी करा ! 

साधकांना सूचना

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एखाद्या वस्तूचे उत्पादन होत असतांना तिच्यामध्ये उत्पादनाच्या ठिकाणची आणि ती निर्माण करणार्‍यांची स्पंदने येत असतात. काही वेळा ही स्पंदने नकारात्मक असतात. त्यांचा ती वस्तू वापरणार्‍याला त्रास होऊ शकतो. यासाठी नेहमी तयार कपडे, चपला यांसारख्या वैयक्तिक वापरातील नवीन वस्तू वापरण्यापूर्वी त्यांची ‘गोमूत्र शिंपडणे, गोमूत्र आणि विभूती घातलेल्या पाण्याने धुणे, विभूती लावणे, ऊन दाखवणे’ यांपैकी १ – २ माध्यमांनी आध्यात्मिक स्तरावरील शुद्धी करून घ्यावी आणि त्यानंतरच त्या वस्तू वापराव्या. आध्यात्मिक स्तरावरील शुद्धी होण्यासाठीच पूर्वीच्या काळी नवीन वस्तू आणली की, ती देवाच्या चरणी अर्पण करत असत आणि मग ती वापरण्यास घेत असत. देवाच्या चरणी अर्पण केलेली वस्तू देवाचा प्रसाद बनते आणि तिच्यामध्ये सात्त्विक (सकारात्मक) स्पंदने येतात. अशी वस्तू वापरल्याने आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो.’

–  सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले