कुडचडे येथे भर बाजारातील दुकाने फोडून चोरी

कुडचडे, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात. चोरट्यांनी ४ दुकानांमधून एकूण २० सहस्र रुपये रोख रक्कम पळवली.