अनुभूतींच्या माध्यमातून आनंद मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७३ व्या जन्मोत्सवाचा भावसोहळा पहातांना ‘हा स्वर्गीय सोहळा असून सर्व देवता आणि ऋषिमुनी इथे उपस्थित आहेत’, असे मला वाटले.
२. परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्पवृष्टी होत असतांना ‘ते ध्यानावस्थेत बसले असून सर्व देवता आणि ऋषिमुनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे वाटले. या वेळी ‘सूक्ष्मातून अद्वितीय असे काहीतरी घडत आहे’, असे मला जाणवले.
३. ‘ही घटना भगवान श्रीकृष्णाच्या ‘विश्वरूप’ दर्शनाच्या प्रसंगाइतकीच महत्त्वाची आहे’, असे वाटत होते.
४. पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांची कन्या ॐ अक्षरा नृत्य करत असतांना मला पुष्कळ आनंद जाणवत होता. त्या वेळी ‘देवी स्वतःच नृत्य करत आहे’, असे वाटत होते.
५. हा संपूर्ण सोहळा चैतन्यमय होता आणि संपूर्ण आश्रम त्या चैतन्याने भरून गेला होता.
६. हा सोहळा पहातांना मला कसलाही त्रास झाला नाही.’
– कु. रश्मी परमेश्वरन्, केरळ (१९.५.२०१५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक