वांद्रे (मुंबई) येथून २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा हस्तगत !

मुंबई – गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ९ च्या पोलिसांनी २४ मार्च या दिवशी वांद्रे येथे २५ लाख रुपयांचा मास्कचा साठा पकडला आहे. मागणी असूनही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी मास्क उपलब्ध होत नसतांना या ठिकाणी मास्कचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आला होता. पकडण्यात आलेले मास्क ३ ट्रकमध्ये भरून ठेवलेले होते. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली.