Aland Dargah Conflict : आळंद लाडले मशाक दर्गा दंगलीतील सर्व मुसलमान आरोपींवरील गुन्हे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने घेतले मागे

मुसलमानांनी शिवलिंगावर केले होते मलमूत्र विसर्जन

आळंद लाडले मशाक दर्गा (डावीकडे) व यू.टी. खादर यांच्या विनंतीचे पत्र (उजवीकडे)

कलबुर्गी (कर्नाटक) – कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद शहरातील प्रसिद्ध लाडले मशाक दर्गा दंगलीशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर यांच्या लेखी विनंतीवरून हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे दंगलीत सहभागी असलेल्या मुसलमान तरुणांना आणि काही प्रमुख नेत्यांना याचा लाभ होणार आहे.

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडून निर्णयाचे समर्थन

गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांना विचारणा करण्यात आली असता ते म्हणाले की, मी विस्तृत माहिती सांगणार नाही. मंत्रीमंडळामध्ये सर्व गोष्टींवर चर्चा करून कायदेशीर चौकटीत राहूनच सुटकेचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही निर्णय अचानक घेतलेला नाही.

काय आहे प्रकरण ?

वर्ष २०२२ मधील महाशिवरात्रीच्या वेळी आळंद शहरातील लाडले मशाक दर्गा परिसरात असलेल्या राघव चैतन्य शिवलिंगाची पूजा करण्याच्या सूत्रांवरून दोन्ही धर्मियांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. ‘काही मुसलमानांनी पवित्र शिवलिंगावर मलमूत्र विसर्जन करून विकृती दाखवली’, असा आरोप समोर आल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली होती. शिवलिंग अपवित्र झाल्याची माहिती मिळताच जागा स्वच्छ करून पूजा करण्यासाठी तत्कालीन केंद्रीयमंत्री भगवंत खुबा, हिंदु संघटनांचे प्रमुख आणि लोकप्रतिनिधी पुढे आले होते. या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी धाव घेतलेल्या तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या वाहनांवरच संतप्त जमावाने दगडफेक केली होती. काठ्यांनी गाड्यांची तोडफोड करून, प्राणघातक हत्यारे दाखवून सार्वजनिक मालमत्तेची हानी करण्यात आली होती.

या प्राणघातक आक्रमणाच्या आणि निर्माण केलेल्या हिंसक घटनांच्या संदर्भात त्या वेळी पोलिसांनी विविध मुसलमान नेते आणि तरुण यांच्याविरुद्ध एकूण १३ गंभीर गुन्हेगारी प्रकरणे नोंदवली होती. आता सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने ही सर्व १३ प्रकरणे पूर्णपणे मागे घेतली आहेत.

भाजपचा विरोध

राज्य सरकार एका बाजूला हिंदु कार्यकर्त्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे नोंदवण्यासमवेतच पोलिसांकडून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. दुसर्‍या बाजूला मुसलमानांवरील गुन्हेगारी गुन्हे मागे घेतले जात आहेत. काही जाळपोळीची प्रकरणे, मालमत्तेची हानी केल्याची प्रकरणे आदी प्रकरणांसह गंभीर गुन्हे मागे घेऊन ‘आम्ही गुन्हेगारांच्या बाजूने आहोत’, असा वाईट संदेश सरकार दिला आहे, असा आरोप भाजपचे आमदार सी.टी. रवि यांनी यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या मंदिरांचा अवमान केल्यानंतर दंगली घडवणार्‍या मुसलमानांवरील गुन्हे मागे घेणाऱ्या काँग्रेस सरकारने त्यांना पाठीशी घालून हिंदूंना ते पाकिस्तानात रहात असल्याची जाणीव करून दिली आहे. अशा सरकारला सत्तेवर बसवणार्‍या हिंदूंना आतातरी जाग येईल का ?