पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ३ आतंकवाद्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेल्या या तिघांच्या मृत्यूंना सध्या अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

१. पहिले नाव गाझी मुमताज याचे आहे. त्याला लष्कर-ए-तोयबाचा ज्येष्ठ आणि अनुभवी आतंकवादी मानले जात होते. गाझी मुमताज संशयास्पद परिस्थितीत मृत अवस्थेत आढळला. मुमताजने भारतात लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी म्हणून काम केले होते. म्हणूनच लष्करने त्याला ‘गाझी’ ही पदवी दिली होती. तो पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अप्पर दीरच्या बाराहवाल येथील रहिवासी होता. तो लष्करचा प्रमुख हाफिज सईद याचा अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता.

२. अन्य एका प्रकरणात महंमद खुजैमा कासिम या आतंकवाद्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. बहावलपूरमध्ये वाहनाने धडक दिल्याच्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. कासिम हा लष्करचा वरिष्ठ नेता महंमद याकूबचा भाऊ असल्याचे सांगितले जाते.

३. तिसर्‍या आतंकवाद्याच्या संशयास्पद मृत्यूविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

४. तिसरे नाव खालिद बशीर याचे आहे. तोही संशयास्पद परिस्थितीत मृत आढळला आहे.