पाककडून अमेरिकेचा विश्वासाघात !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थी करत असतांना पाकिस्तानने इराणच्या विमानांना त्याच्या नूर खान या वायूदल तळावर उभे करण्याची अनुमती दिली होती. अमेरिकेकडून या विमानांना लक्ष्य केले जाऊ नये; म्हणून पाकने इराणला साहाय्य केले होते, अशी माहिती उघड झाली आहे.
१. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आणि रिपब्लिकन पक्षाचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी युद्ध रोखण्याविषयी पाकिस्तानने मध्यस्थी करण्याच्या सूत्राचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, इस्रायलविषयी पाकिस्तानी संरक्षण अधिकार्यांची काही जुनी विधाने पहाता, जर ही घटना खरी ठरली, तर मला आश्चर्य वाटणार नाही.
२. अमेरिकी अधिकार्यांनी सांगितले की, या विमानांमध्ये इराणी वायूदलाचे एक ‘आरसी-१३०’ हे विमानही समाविष्ट होते. या विमानाचा वापर हेरगिरी आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केला जातो. इराणने अफगाणिस्तानमध्येही काही नागरी विमाने पाठवली होती; परंतु त्या विमानांमध्ये लढाऊ विमानांचा समावेश होता कि नाही ? हे स्पष्ट होऊ शकले नाही.
३. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानने कराची बंदरातून त्याच्या २ पाणबुड्या इराणच्या सीमेजवळ पाठवल्या होत्या. पाणबुड्यांना भारतीय आक्रमणांपासून वाचवण्यासाठी पाकिस्तानने असे केले होते.
पाकने आरोप फेटाळले !
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळून लावतांना म्हटले की, ही विमाने इराण आणि अमेरिका यांच्याशी संबंधित राजनैतिक अन् प्रशासकीय अधिकार्यांची आहेत, जे युद्धबंदीच्या चर्चेच्या वेळी तिथे पोचले होते. या विमानांची कोणतीही सैनिकी भूमिका नव्हती. (पाकने किती स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार ? – संपादक)

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan