दापोली येथील विद्यार्थ्यांनी पोलीस आणि एस्.टी. आगारप्रमुख यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी

दापोली – तालुक्यामध्ये ४ ते १० जुलै या कालावधीमध्ये ४ ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हे नोंद झाल्यामुळे महिला, प्रामुख्याने महाविद्यालयीन युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनामध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, या पार्श्वभूमीवर ‘निवेदिता प्रतिष्ठान’च्या पुढाकाराने येथील एन्.के. वराडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १३ जुलैला येथील पोलीस ठाण्यात आणि एस्.टी. आगारप्रमुख यांच्याकडे संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची, तसेच विकृत मनोवृत्तीच्या वाहकाच्या बडतर्फीची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी उपस्थित नागरिक आणि विद्यार्थी यांनी ‘सर्व आरोपींना भर चौकामध्ये पोलिसांनी चाबकाचे फटके मारावेत.’, अशी आग्रही मागणी केली. (या मागणीवरून जनतेमध्ये त्वरित न्याय न मिळण्याविषयीची चीड आणि संताप किती आहे, हेच लक्षात येते ! – संपादक)
निवेदनातील महत्त्वाची सूत्रे,
१. डिसेंबर २०२५ मध्ये हर्णे येथील एका ७२ वर्षीय वृद्धाने एका २५ वर्षीय दिव्यांग युवतीवर बलात्कार केला. त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी.
२. दापोली तालुक्यातील महिला, प्रामुख्याने युवती आणि शालेय विद्यार्थिनींच्या मनात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बलात्कार आणि छेडछाडीचा घटनांमुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून ‘आम्हाला संरक्षण द्या’, अशी कळकळीची आग्रही विनंती महाविद्यालयीन युवतींनी केली.
हे निवेदन देते वेळी निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रशांत परांजपे समन्वयक डॉ.प्रा. स्कंधा खेडेकर, प्रा. प्राजक्ता शिगवण, दापोली तालुका व्यापारी संघटनेचे सचिव मिलिंद शेठ, योगेश साटम, मुग्धा सरदेसाई, जोग मॅडम, मंडलिक मॅडम यांच्यासह, नागरिक आणि मोठ्या संख्येने एन्.के. वराडकर आणि बेलोसे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम