खेड-दापोली मार्गावरील कुवे घाटातील घटना

खेड – खेड-दापोली मार्गावर कुवे घाटात एका प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शाहरुख युसुफमिया कुरुपकर (रुखी) आणि फाईज अकबर हुसेनी (मुंबके) या २ संशयित आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील त्यांचा तिसरा साथीदार सार्थक खेडेकर (खेड) हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी रोहन राजू तांबे (शिव, खेड) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
१. रोहन तांबे हे दापोलीहून खेडला येण्यासाठी दापोली बसस्थानकाबाहेर खाजगी वाहनाची वाट पहात थांबले होते. याच दरम्यान संशयित आरोपींनी चारचाकी त्यांच्यासमोर थांबवून खेडला येण्याविषयी विचारणा केली. रोहन यांनी होकार देत चारचाकीमध्ये प्रवेश केला.
२. चारचाकी कुवे घाटात आली असता आरोपींनी गाडी थांबवली. त्यांनी रोहन यांच्या पोटाला चाकू लावून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आणि लुटमार केली. एवढ्यावरच न थांबता संशयितांनी रोहन यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओसुद्धा भ्रमणभाषवर चित्रीत केला.
३. त्यानंतर साखरोली येथील पेट्रोल पंपाजवळ गाडी आली असता आरोपींनी रोहन यांच्या भ्रमणभाषमधील ‘गूगल पे’वरून स्वतःच्या ‘फोन पे’ स्कॅनरवर आधी २०० रुपये, नंतर १ सहस्र रुपये आणि शेवटी पुन्हा भ्रमणभाष हिसकावून घेत ५ सहस्र रुपये, असा एकूण ६ सहस्र २०० रुपये ऑनलाईन बळजोरीने ट्रान्सफर करून घेतले.
४. तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वॅगनार जप्त केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे करत आहेत.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
संपादकीय : अमेरिकी तरुणांची रचनात्मकता !