|

नवी देहली : मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेत २३ जानेवारीला वसंतपंचामीच्या दिवशी हिंदूंना संपूर्ण दिवस पूजा करण्याची अनुमती देण्याच्या मागणी सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार २३ जानेवारीला भोजशाळेत सूर्याेदयापासून दुपारी १ वाजेपर्यंत पूजा, १ ते ३ नमाजपठण आणि नंतर पुन्हा सूर्यास्तापर्यंत पूजा करण्यास अनुमती दिली आहे. या संदर्भात ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. २३ जानेवरीला शुक्रवार येत असल्याने आणि नेहमीप्रमाणे मुसलमान नमाजपठणासाठी येथे येत असल्याने या दिवशी पूर्ण दिवस हिंदूंना पूजा करण्यासाठी अनुमती देण्याची हिंदूंची मागणी होती.
The Supreme Court of India ⚖️ allowed both Hindu religious ceremonies 🕉️ and Muslim prayers ☪️ at the disputed Bhojshala complex in Dhar district, Madhya Pradesh on Basant Panchami and FRIDAY, 23 January 2026, with specific arrangements to maintain peace and law and order 🕊️.… pic.twitter.com/HE3WhHWoKn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 22, 2026
‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ने वसंतपंचमीला भोजशाळेत केवळ हिंदूंनाच सरस्वती देवीची पूजा करण्याची अनुमती द्यावी आणि त्या दिवशी मुसलमानांना प्रवेश रोखावा, अशी मागणी केली होती. यावर मशीद समितीच्या वतीने अधिवक्ता सलमान खुर्शिद यांनी याचिकेला विरोध केला. याआधी ३ वेळा असे झाले असल्याने याचिका सुनावणीस पात्र नसल्याचे खुर्शिद यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकून न्यायालयाने हिंदु आणि मुसलमान दोन्ही पक्षांना पूजा आणि नमाजपठण करण्याची अनुमती दिली.
The Bhojshala–Kamal Maula complex has been under ASI protection since 1951, and the dispute over religious status has been in the courts for decades, especially after the 2003 ASI order dividing access between Hindus and Muslims. The issue is now sub judice.⚖️
ASI’s April 2025… pic.twitter.com/0PMILCx4ju
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 22, 2026
न्यायालयाने आदेशात नमूद केले की, मुसलमानांकडून नमाजपठणासाठी अंदाजे संख्या आजच जिल्हाधिकार्यांना दिली जाईल, जेणेकरून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रवेशपत्र देता येतील. दोन्ही पक्षांनी परस्पर सन्मान आणि विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक