अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

अक्षय्य तृतीयेला ‘सत्पात्रे दान’ करून ‘अक्षय्य दाना’चे फळ मिळवा !

‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे हिंदु धर्मातील साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि या दिवशी केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही, म्हणजे त्यांचे फळ मिळतेच, त्यामुळे अनेक जण या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म करतात.

गुढीपाडव्याचे आरोग्य विधान !

चैत्र मासापासून उन्हाचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे ऋतुजन्य व्याधी जसे की, मुरूम-पुटकळ्या, फोडे, घामोळ्या आणि इतर त्वचारोगांपासून रक्षणासाठी कडुलिंबाचे सेवन उपयोगी असते.

हिंदूंनो, धर्माचरण करून गुढीपाडव्याचा सण सात्त्विक पद्धतीने साजरा करूया आणि स्वत:तील धर्मतेज जागवूया !

सुती किंवा रेशमी नऊवारी साडी आणि धोतर यांमध्ये पुष्कळ सात्त्विकता अन् चैतन्य असल्यामुळे ही वस्त्रे परिधान करणार्‍यांनाही सात्त्विकता, तसेच चैतन्य यांचा लाभ होण्यास साहाय्य होेते.

गुढीपाडव्याला शुभ संकल्प करूया !

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्वत:च्या प्रकृतीनुसार केलेले संकल्प दैवी ऊर्जेमुळे निश्चितच फलद्रूप होतात. या निमित्ताने आपण काही संकल्प, निश्चय करून वर्षारंभाचा लाभ मिळवून घेऊ शकतो.

दुष्प्रवृत्तींचे निर्दालन अन् संघटित होण्याची प्रेरणा देणारा गुढीपाडवा !

वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा एक मोठा मुहूर्त आहे आणि शालिवाहन शकाचा प्रारंभ या दिवसापासून होते.

खल्वायनच्या गुढीपाडवा मैफलीत रंगणार सुप्रसिद्ध गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन

१९९८ पासून गुढीपाडवा आणि दिवाळी पाडवा अशा सणांना आयोजित केली जाणारी ही विशेष संगीत मैफल यावर्षीच्या गुढीपाडव्याला होणारी सुवर्ण महोत्सवी विशेष संगीत मैफल आहे.

ब्रह्मध्वज पूजा-विधी

‘गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे ?’ हे मंत्रांसह वाचकांसाठी येथे देत आहोत. प्रत्यक्ष गुढी ज्या ठिकाणी उभारावयाची आहे, त्या ठिकाणी गुढी उभारून हे पूजन करावे.    

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करतात. शरिराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊन (गरम) पाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करावे लागते.

गुढीपाडवा साजरा करू न देण्याचा हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्टे यांचा फसवा प्रयत्न !

हिंदूंचा नववर्षारंभ हिंदूंंनी साजरा करू नये’, म्हणूनच फाल्गुन अमावास्येला औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली.