रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.
‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.
‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’
धर्माभिमानी श्री. किरण कुलकर्णी यांनी श्री भवानीदेवीला हात जोडल्यावर सर्व धर्माभिमानी अधिवेशनाला आलेले पाहून देवीला पुष्कळ आनंद झाल्याचे त्यांना जाणवणे आणि ‘देवीने फुलाच्या रूपाने त्याला दुजोरा दिला आहे’, असे वाटणे
‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित असून वाखाणण्याजोगा आहे. आश्रम सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरलेला आहे.’
‘आश्रम पहाणे’, हा माझ्यासाठी एक अप्रतिम अनुभव होता. येथील स्वच्छता, मांडणी आणि साधकांचे मार्गदर्शन अतुलनीय आहे. येथील साधकांसारखी भक्ती अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही.’
येथील सकारात्मकतेमुळे माझा भाव जागृत होतो आणि मला भावावस्था अनुभवता येते. आश्रमात असतांना मिळालेले समाधान आणि आत्मीयता नंतर अनेक दिवसांपर्यंत टिकून रहाते. आश्रमातील कार्य असेच निरंतर चालू राहू दे.
‘आश्रमातील सर्व साधकांचे वागणे आणि हसतमुख तोंडवळे पाहून ‘आपणही असेच असले पाहिजे’, असे मला वाटले. ‘आश्रमाला पुनःपुन्हा भेट दिली पाहिजे’, असे मला वाटते.’
‘ध्यानमंदिरात ध्यानास बसल्यावर आवरण अल्प झाले ’, असे वाटले. नकारात्मकता न्यून होऊन सकारात्मकता वाढली आणि ‘मन हलके झाले’, असे जाणवले.’…
दहाव्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातीलच नव्हे, तर सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना, त्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रप्रेमी संस्था यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत होणे आवश्यक आहे. – सद्गुरु श्री. नवनीतानंद (गुरुवर्य पू. मोडक) महाराज
‘आश्रम अतिशय सुंदर आहे. येथे आल्यावर मला वाटले, ‘जणू मी या पृथ्वीवरील दुसर्या जगात आलो आहे.’ माझ्या अंतःकरणातील भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत.’