रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !

 

१. ‘हा आश्रम, येथील व्यवस्थापन, येथे केले जाणारे आदरातिथ्य आणि साधक, हे सर्वच चांगले आहे. येथे संस्कार आणि संस्कृती प्रत्यक्ष जगली जात आहे. हे सर्व पाहून मला ‘मी हिंदू आहे’, असे अभिमानाने म्हणावेसे वाटते.’ – श्री. रामकृष्ण सीता, कुंदापूर, उडुपी, कर्नाटक. (१२.६.२०२२)

२. ‘आश्रम हा देवलोकच आहे’, असे मला वाटले. आश्रम पाहून ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले.’ – अधिवक्ता उदय बी.के., बेळ्तंगडी, जिल्हा दक्षिण कन्नड, कर्नाटक. (१२.६.२०२२)

३. ‘आश्रमातील साधक अतिशय नम्र आणि सुसंस्कृत आहेत. आश्रमाचा संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरलेला आहे. या ठिकाणी देवाचे अस्तित्व आहे. येथे शिकण्यासारखे पुष्कळ आहे. मी येथे येऊन नवनवीन संकल्पना शिकून जातो.’ – श्री. तपन कुमार घोष (संस्थापक, सनातन धर्म संस्कृती एवं अध्यात्मचर्चा केंद्र), कोलकाता, बंगाल. (१३.६.२०२२)

४. ‘आश्रम पहाणे’, हा माझ्यासाठी एक अप्रतिम अनुभव होता. येथील स्वच्छता, मांडणी आणि साधकांचे मार्गदर्शन अतुलनीय आहे. येथील साधकांसारखी भक्ती अन्यत्र कुठेही पहायला मिळत नाही.’ – श्री. गौतम बोस (उपाध्यक्ष, पश्चिम बंगेर जन्य), कोलकाता, बंगाल. (१३.६.२०२२)

५. ‘आश्रमात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद अनुभवायला मिळतो. सनातन हिंदु धर्माची महती संपूर्ण जगाला सांगण्याचे येथे चालू असलेले कार्य स्तुत्य आहे.’ – श्री. प्रशांत संबरगी, बेंगळुरू, कर्नाटक. (१३.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक