१. ‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित असून वाखाणण्याजोगा आहे. आश्रम सकारात्मक ऊर्जेने (चैतन्याने) भरलेला आहे.’ – अधिवक्त्या (सौ.) स्वराग्नी मूर्ती, बेंगळुरू, कर्नाटक. (१२.६.२०२२)
२. ‘आश्रम दैवी आणि आध्यात्मिक असून येथे केवळ सकारात्मक ऊर्जाच (चैतन्य) आहे.’ – अधिवक्त्या (सौ.) रचना नायडू, दुर्ग, छत्तीसगड. (१३.६.२०२२)
३. ‘आश्रमात असतांना मी जे अनुभवले, ते मला शब्दांत सांगता येत नाही. ती अनुभूती उत्कृष्ट आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रेरणादायी होती.’ – श्री. मानस सिंग रॉय, हावडा, बंगाल. (१३.६.२०२२)
४. ‘आश्रम पहातांना मला अतिशय दिव्य आणि जगावेगळीच अनुभूती आली.’ – श्री. ए.व्ही. बागुर, बेंगळुरू, कर्नाटक. (१३.६.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार अधिवक्ता आणि धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |