१५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचार्‍याला पकडले !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! पोलीसच लाच घेत असतील, तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे राज्य कसे येणार ?

धारणी (जिल्हा अमरावती) येथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित !

असे अनैतिक वर्तन करणारे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?

मुंबई येथे ‘झेप्टो’च्या मुसलमान ‘डिलिव्हरी बॉय’कडून युवतीचा विनयभंग !

युवतींनो, अशा वासनांधांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

नैतिकतेचे अधःपतन !

शिक्षिकेला त्रास देणार्‍या या मुलांना शिक्षा होईल का ? या मुलांना मोकाट सोडले, तर शिक्षिकेला त्रास देणारी ही मुले समाजातील मुली आणि महिला यांच्याशी कशा प्रकारे वागतील, याचाही विचार व्हायला हवा. नीतीवान पिढी घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र पालट हवा, हे मात्र नक्की !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात अटकपूर्व जामीन संमत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात ठाणे न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला आहे. न्यायमूर्ती प्रणय गुप्ता यांनी हा निर्णय दिला. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाणे येथे आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता.

आव्हाड यांच्यावरील कारवाईवरून राज्य सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा अजित पवारांचा आरोप

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

माझ्या विनयभंगाविषयी राज्य महिला आयोगाची भूमिका मला पहायची आहे ! – रिदा रशीद, महामंत्री, महिला मोर्चा, भाजप

मी सुप्रिया सुळे यांना विचारेन की, ज्या पद्धतीने माझ्याशी घटना घडली तीच परंपरा आहे का ? महिलांना असेच ढकलून देत बाजूला लोटता का ? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असेच होते का ? यावर महिला आयोग काय भूमिका घेते ? हे  मला पहायचे आहे.

सागर (मध्यप्रदेश) येथे सरकारी शिक्षक शमीम याने हिंदु महिलेचे केले धर्मांतर !

अशा घटना प्रतिदिन घडत आहेत. यातून धर्मांध मुसलमानांच्या षड्यंत्राची व्याप्ती लक्षात येते. त्यामुळे सरकारने अशांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी कुणी केल्यास त्यात चुकीचे काय ?

मंत्रालयात वरिष्ठ अधिकार्‍याकडून उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकार्‍याचा विनयभंग !

मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वासनांध वृत्तीचे अधिकारी असणे राज्यासाठी लज्जास्पद !

नागपूर येथे शिकवणीवर्ग शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग !

शहरातील हनुमाननगर येथील माहेश्वरी मँथ शिकवणीचे संचालक शिक्षक अरविंद माहेश्वरी (वय ५२ वर्षे) यांनी गणिताचा सराव घेण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. ही घटना ऑक्टोबर मासाच्या पहिल्या आठवड्यात घडली.