प्रयत्नांमध्ये खंड पडणे स्वाभाविक असल्याने त्याविषयी वाईट वाटून न घेता पुन्हा प्रयत्न चालू करावेत !

काही जण प्रयत्नांमध्ये खंड पडल्यावर ‘मला हे जमणारच नाही’, असा विचार करून प्रयत्न करायचेच सोडून देतात. असे न करता जेव्हा प्रयत्नांमध्ये खंड पडेल, तेव्हा पुन्हा नव्याने प्रयत्न चालू करावेत.

घामामुळे होणार्‍या त्वचा रोगांना प्रतिबंध करण्यासाठी सनातन उटण्याचा वापर करा  

‘१ भाग सनातन उटणे आणि १ भाग मसूरडाळीचे किंवा चणाडाळीचे पीठ असे मिश्रण बनवून ठेवावे. प्रतिदिन अंघोळीच्या वेळी साबणाऐवजी यातील १ – २ चमचे मिश्रण थोड्याशा पाण्यात कालवून अंगाला लावावे आणि लगेच अंघोळ करावी.

उन्हाळ्यातील थकव्यावर सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘उन्हाळ्याच्या दिवसांत प्रतिदिन दिवसातून २ वेळा ‘सनातन शतावरी चूर्ण वटी’ या औषधाच्या २ – २ गोळ्या, तसेच १ – १ चहाचा चमचा ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’ थोड्याशा पाण्यासह घ्यावे. याने उन्हाळ्यात येणारा थकवा न्यून होण्यास साहाय्य होते.’

नियमित व्यायाम केल्याने होणारे लाभ

‘नियमित व्यायाम केल्याने शरिराचे बळ, तसेच कार्य करण्याची क्षमता वाढते.

आहारातील पोषकांश शरिराला पूर्णपणे उपलब्ध होण्यासाठी सकाळचा पहिला आहार जठराग्नी प्रदीप्त झाल्यावरच घ्यावा !

आजकाल अनेकांमध्ये पुरेसा आहार घेऊनसुद्धा रक्तातील ‘हिमोग्लोबिन’, ‘कॅल्शियम’ यांसारखे घटक न्यून असणे, तसेच थकवा येणे, उत्साह नसणे, शरीर कृश असणे इत्यादी लक्षणे आढळतात.

लठ्ठपणा न्यून करू इच्छिणार्‍यांसाठी सुसंधी

लठ्ठपणा न्यून करण्यासाठी मित (अल्प) जेवण आणि व्यायाम या दोनच गोष्टी नेमाने करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात, तसेच पावसाळ्यात नैसर्गिकपणे भूक मंदावते.

उष्णतेच्या विकारांवर सनातनची आयुर्वेदाची औषधे

‘उष्णतेच्या विकारांवर दिवसातून ३ वेळा अर्धा चहाचा चमचा सनातन वासा (अडुळसा) चूर्ण आणि अर्धा चहाचा चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण एकत्र करून अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. असे साधारण १ ते २ आठवडे करावे.’

उन्हाळ्यात तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ खाणे टाळावे !

‘वडापाव, मिरचीभजी, चिवडा, चिप्स, पाणीपुरी, भेळ यांसारखे तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ पित्त वाढवणारे असतात. उन्हाळ्यात असे पदार्थ खाल्ल्याने तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, लघवीच्या वेळेस जळजळणे, चक्कर येणे, अंगाला खाज येणे, केसतूड (गळू) होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

कोरड्या खोकल्‍यावर सनातन भीमसेनी कापराचा उपाय

‘घशात खवखव सुटून कोरडा खोकला येतो, तेव्‍हा सनातन भीमसेनी कापराचा पुढीलप्रमाणे उपाय करावा. फोडणीची लहान कढई किंवा लोखंडी पळी गॅसवर गरम करावी.

उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत उष्‍ण औषधांचा वापर टाळावा !

उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत सनातनच्‍या आयुर्वेदाच्‍या औषधांपैकी ‘उष्‍ण’ औषधांचा वापर टाळावा. शुंठी (सुंठ) चूर्ण, पिप्‍पली (पिंपळी) चूर्ण, त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्‍या) आणि लशुनादी वटी (गोळ्‍या) ही औषधे ‘उष्‍ण’ आहेत.