उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत उष्‍ण औषधांचा वापर टाळावा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८३

वैद्य मेघराज पराडकर

‘उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत सनातनच्‍या आयुर्वेदाच्‍या औषधांपैकी ‘उष्‍ण’ औषधांचा वापर टाळावा. शुंठी (सुंठ) चूर्ण, पिप्‍पली (पिंपळी) चूर्ण, त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्‍या) आणि लशुनादी वटी (गोळ्‍या) ही औषधे ‘उष्‍ण’ आहेत. (पावसाळा चालू झाल्‍यावर या उष्‍ण औषधांचा वापर केल्‍यास चालतो.) उन्‍हाळ्‍यात या औषधांच्‍या ऐवजी सनातनची आयुर्वेदाची पुढील औषधे वापरावीत.

१. खोकल्‍यावर सुंठ किंवा पिंपळी यांऐवजी वासा (अडुळसा) चूर्ण : पाव चमचा वासा (अडुळसा) चूर्ण अर्धा चमचा मधात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा चाटून खावे. हा उपचार ७ दिवस करावा.

२. तापावर त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्‍या) या औषधाऐवजी मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण : पाव चमचा मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण अर्धी वाटी पाण्‍यात मिसळून दिवसातून ३ – ४ वेळा प्‍यावे. हा उपचार ५ ते ७ दिवस करावा.

३. अपचनावर लशुनादी वटी (गोळ्‍या) या औषधाऐवजी सूतशेखर रस (गोळ्‍या) : पुष्‍कळ जेवल्‍याने पोट गच्‍च झाल्‍यास सूतशेखर रस या औषधाची १ गोळी चघळून खावी. हा उपचार एका वेळेस एकदाच करावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan