सनातनची आयुर्वेदाची औषधे
‘१ भाग सनातन उटणे आणि १ भाग मसूरडाळीचे किंवा चणाडाळीचे पीठ असे मिश्रण बनवून ठेवावे. प्रतिदिन अंघोळीच्या वेळी साबणाऐवजी यातील १ – २ चमचे मिश्रण थोड्याशा पाण्यात कालवून अंगाला लावावे आणि लगेच अंघोळ करावी. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, तसेच घामामुळे होणार्या त्वचा विकारांना प्रतिबंध होण्यास साहाय्य होते.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२३)