तापातून लवकर बरे होण्‍यासाठी हे करावे !

ताप असतांना आपोआप उलटी झाल्‍यास लगेच उलटी थांबवण्‍याचे औषध घेऊ नये. तापामध्‍ये आपणहून एखाददुसरी उलटी झाल्‍यास ताप लवकर बरा होतो. (स्‍वतः मुद्दामहून उलटी करणे टाळावे.)’

बुरशीजन्‍य त्‍वचाविकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी कपडे नीट वाळवूनच वापरावेत

‘पावसाळ्‍यात वातावरणामध्‍ये आर्द्रता अधिक असल्‍याने बुरशीजन्‍य त्‍वचाविकार (फंगल इन्‍फेक्‍शन) होण्‍याची शक्‍यता वाढते. या विकारांचा प्रतिबंध होण्‍यासाठी ओलसर कपडे वापरणे टाळावे.’

पावसाळ्‍यामध्‍ये पचायला जड असलेले पदार्थ खाणे टाळावे !

पावसाळ्‍यामध्‍ये शरिरातील अग्‍नीही (पचनशक्‍तीही) वरील उदाहरणातील निखार्‍यांप्रमाणे मंद असतो. अशा वेळी इडली, पावभाजी, वडापाव, साबुदाण्‍याची खिचडी, श्रीखंड, पुरणपोळ्‍या, अन्‍य पक्‍वान्‍ने यांसारखे पचायला जड पदार्थ खाणे, म्‍हणजे अग्‍नीवर अत्‍याचार करणे होय.

पचायला जड आणि हलके पदार्थ कसे ओळखावेत ?

‘जे पदार्थ खाल्‍ल्‍यावर सुस्‍ती येते किंवा शरिरात जडपणा जाणवतो, ते पदार्थ पचायला जड असतात. सर्व प्रकारची पक्‍वान्‍ने, गोडधोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ (तूप आणि ताक सोडून), कच्‍चे (न शिजवलेले) पदार्थ (उदा. कच्च्या भाज्‍या, भिजवलेली किंवा मोड आणलेली कडधान्‍ये), ही जड पदार्थांची काही उदाहरणे आहेत.

पावसाळ्‍यामध्‍ये वातावरणात, तसेच शरिरात होणारे पालट

‘पावसाळा चालू झाल्‍यावर वातावरणात एकाएकी थंडावा निर्माण होतो. पावसाचे पाणी उंचावरून, वरच्‍या भागातून वाहून सखल भागांमध्‍ये येऊन साठते. या पाण्‍यामध्‍ये माती, तसेच अन्‍य प्रदूषित घटक मिसळलेले असतात. यामुळे पाणी प्रदूषित होते. वातावरणातील या पालटांमुळे शरिरामध्‍ये वात आणि पित्त वाढतात.

पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी तुळशीच्‍या मंजिर्‍या जमवून ठेवाव्‍यात !

येत्‍या पावसाळ्‍यात तुळशीची लागवड करण्‍यासाठी प्रत्‍येकाने तुळशीच्‍या वाळलेल्‍या मंजिर्‍या गोळा करून ठेवाव्‍यात. तुळशीच्‍या लागवडीविषयीची माहिती, तसेच तिचे औषधी गुणधर्म सनातनचा ग्रंथ ‘जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार औषधी वनस्‍पतींची लागवड’ यात दिली आहे.

विकतचे खाद्यपदार्थ खाण्‍यापेक्षा घरगुती पौष्‍टिक खाद्यपदार्थ खावेत !

बिस्‍किटे, शेव, चिवडा, चिप्‍स, फरसाण यांसारखे विकतचे तेलकट पदार्थ कधीतरी गंमत किंवा पालट म्‍हणून खाण्‍यास आडकाठी नसते; परंतु असे पदार्थ नियमितपणे खाणे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने चांगले नसते. हे पदार्थ बनवण्‍यासाठी पामतेलासारख्‍या निकृष्‍ट तेलाचा वापर केला जातो. यांतून शरिराला काहीच पोषणमूल्‍य प्राप्‍त होत नाही.

कच्चे तेल खाणे चुकीचे

‘कच्चे खाद्य तेल अग्नी (पचनशक्ती) मंद करणारे असते. असे तेल नियमित खाल्ल्याने तोंड येणे, पित्ताचा त्रास होणे, अंगावर पुरळ येणे, असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे चटणीवर किंवा भातावर कच्चे तेल घालून खाऊ नये.

रात्रीची झोप पूर्ण होणे महत्त्वाचे !

काही जण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात आणि पुन्‍हा सकाळी लवकर उठतात. मग रात्रीची झोप पूर्ण झाली नाही; म्‍हणून दुपारी जेवल्‍यावर झोपतात. असे कधीतरी झाले, तर शरिराला मोठासा फरक पडत नाही; परंतु नेहमी असेच चालू राहिले, तर ते शरिराच्‍या दृष्‍टीने हानीकारक असते.

कृतज्ञता

‘निरोगी जीवनासाठी आयुर्वेद’ या लेखमालिकेचे २०० भाग आज पूर्ण होत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तसेच भगवान श्रीकृष्ण यांची कृपा आणि वाचकांनी भरभरून दिलेले प्रेम यांच्यामुळेच हे शक्य झाले. यासाठी मी सर्वांप्रती कृतज्ञ आहे.