झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पाहू नये !
‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्याचे एक मुख्य कारण झाले आहे. त्यामुळे रात्री झोपण्याच्या न्यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’
‘रात्री झोपतांना भ्रमणभाष (मोबाईल) पहाणे’, हे आजकाल शांत झोप न लागण्याचे एक मुख्य कारण झाले आहे. त्यामुळे रात्री झोपण्याच्या न्यूनतम १ घंटा आधीपासून भ्रमणभाषचा वापर टाळावा.’
प्रतिदिन सकाळी उठल्यावर, तसेच रात्री झोपण्यापूर्वी दंतमंजनाने दात घासल्याने तोंडातील विकृत कफ दूर होतो, तसेच दातांना बळकटी येते. दात किडणे थांबून दातांचे आरोग्य सुधारते.
थंडी पडणे न्यून झाल्यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्यात मिसळून घ्यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्ये घालून उकळून प्यावे. असे केल्याने कफाचे विकार आटोक्यात रहाण्यास साहाय्य होते.
एवढे अमूल्य शरीर देवाने आपल्याला विनामूल्य दिले आहे, याविषयी सतत कृतज्ञता मनात ठेवून आपण शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. इथे दिलेले प्रयत्न नियमित करावेत . . .
गोड पदार्थ जेवणाच्या आरंभी खावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे; परंतु फळे किंवा सुकामेवा जेवण झाल्यावर खाऊ शकतो.
व्यायामामध्ये खंड पडू नये, यासाठी घरातील सर्वांनी सर्वांच्या सोयीनुसार एखादी वेळ ठरवून एकत्र येऊन व्यायाम करावा. असे केल्याने व्यायामात सातत्य टिकून रहाते.
दात निरोगी रहाण्यासाठी दातांच्या मुळांशी असलेला हा मळ काढावा लागतो; परंतु दात ब्रशने घासून हा मळ निघत नाही. त्यामुळे एकदा दंतवैद्यांकडे जाऊन आपले दात तपासून घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार दात स्वच्छ करून घ्यावेत.
सर्व प्रकारच्या तापांवर हा आयुर्वेदाचा प्राथमिक उपचार आहे. याप्रमाणे केल्यास ताप हटकून बरा होतो; परंतु तरीही ३ दिवसांत गुण न आल्यास स्थानिक वैद्यांकडून उपचार घ्यावेत.
दूध आणि मीठ यांचा संयोग आरोग्याला हानीकारक आहे.
हिवाळ्यात केळी खाऊ शकतो का ? सर्दी झाली असल्यास केळी खाल्ली, तर चालेल का ?