दुपारच्‍या वेळेत बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होईल, अशी उपाययोजना करा !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १५९

संग्रहित चित्र
वैद्य मेघराज पराडकर

‘सध्‍या दुपारच्‍या वेळेत उन्‍हाची तीव्रता पुष्‍कळ वाढली आहे. त्‍यामुळे दुपारच्‍या वेळी बाहेर जायचे असल्‍यास उन्‍हापासून संरक्षण होण्‍यासाठी छत्री, गॉगल इत्‍यादींचा वापर करावा. आवश्‍यकतेनुसार एखादा कपडा ओलसर करून डोक्‍यावर ठेवावा. तहान लागल्‍यावर पुरेशा प्रमाणात पाणी प्‍यावे. असे केल्‍याने उन्‍हाचा त्रास होणार नाही.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.२.२०२३)

या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी bit.ly/ayusanatan या लिंकला भेट द्या 

आयुर्वेदाविषयी शंका [email protected] मेल करा !