मनुष्या-मनुष्यात भेद केवळ श्रद्धेमुळेच !
‘मनुष्या-मनुष्यात जर काही भेद असेल, तर तो श्रद्धेमुळेच होय. अन्य कशामुळे नाही. ‘एक जण थोर, तर दुसरा सामान्य आणि दुर्बल’, असे कशामुळे होत असेल, तर ते श्रद्धेमुळेच.’
‘मनुष्या-मनुष्यात जर काही भेद असेल, तर तो श्रद्धेमुळेच होय. अन्य कशामुळे नाही. ‘एक जण थोर, तर दुसरा सामान्य आणि दुर्बल’, असे कशामुळे होत असेल, तर ते श्रद्धेमुळेच.’
‘मन जितके शुद्ध, तितके ते नियंत्रित करण्यास सोपे असते. मन नियंत्रित करावयाचे असल्यास ते शुद्ध केले पाहिजे.’
‘‘जसा तुम्ही विचार आणि चिंतन कराल, तसेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल, तर तुम्ही दुबळेच व्हाल. स्वतःला तेजस्वी मानाल, तर तेजस्वी व्हाल.’
‘मुलांनो, लक्षात ठेवा की, भित्रे आणि दुर्बलच पापाचरण करतात अन् खोटे बोलतात. साहसी आणि दृढचित्त असलेल्या व्यक्ती सर्वदा नीतीपरायण असतात. नीतीमान, साहसी आणि सहानुभूतीसंपन्न होण्याचा प्रयत्न करा.’
‘एखाद्या विषयावर मन एकाग्र केल्यानंतर तेथून ते इच्छेनुसार न काढता येणे’, हे धोक्याचे असते. अशी अवस्था मोठी तापदायक असते. आपल्या बहुतेक सर्व दुःखांचे कारण हेच की, एखाद्या विषयावरून इच्छेनुसार मन काढून घेण्याची शक्ती आपल्या ठिकाणी नसते.’
‘नियमित श्वासोच्छ्वासामुळे शरीर समतोल अवस्थेत रहाते आणि मग मनापर्यंत पोचणे सोपे जाते. यासाठी साधा प्राणायाम पुरेसा आहे…
भय हेच अधःपतनाचे आणि पापाचे निश्चित कारण आहे. भयामुळेच दुःख प्राप्त होते, भयामुळेच मृत्यू ओढवतो. भयामुळेच सार्या वाईट गोष्टी उत्पन्न होतात आणि या भयाचे कारण कोणते आहे ?
तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे, गुलामाप्रमाणे नव्हे. सतत कर्म करा; पण गुलामाप्रमाणे नव्हे. ‘या जगात तुम्ही एक परके आहात, एक प्रवासी आहात’, या भावनेने कर्म करा…
आपण जितके शांत असू आणि आपले स्नायू जितके अल्प उत्तेजित होतील, तितके आपण अधिक प्रेम करू शकू आणि तितके आपले कर्म अधिक चांगल्या प्रकारे होईल. तुम्ही एखाद्या धन्याप्रमाणे स्वाधीन भावाने कर्म केले पाहिजे….
मनुष्याच्या ठायी वास करणार्या त्या अंतःस्थ सत्तेच्या तुलनेने सर्वकाही गौण आहे. ही सत्ता, म्हणजेच आध्यात्मिकता होय. या आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल