पाश्चात्त्यांच्या ‘डेज’ऐवजी हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा सहभागी युवकांचा संकल्प !
योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजनदिन’ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि यवतमाळ जिल्ह्यांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजनदिन’ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि यवतमाळ जिल्ह्यांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा
मुंबईतील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू लागली आहे. हा निधी कोरोनासाठीच्या उपाययोजनांवर व्यय करण्यात आला असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे चेंबूरमधील ‘एम् पश्चिम’ प्रभागात मागील आठवड्यात दिवसाला सरासरी १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र या आठवड्यात ही संख्या २५ पर्यंत पोचली आहे.
आठवडाभरापासून पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बाजारपेठा, कार्यालये, उपाहारगृह आणि अन्य खासगी कार्यक्रमांना गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा यांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे. दहा दिवसांपूर्वी ४ ते ५ टक्के असलेला संसर्ग वाढीचा दर गेल्या आठवड्यात १० टक्क्यांपर्यंत पोचला आहे
नागपूर येथे वीज माफ करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने धरणे आंदोलन
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे रहाणे एवढाच पर्याय आस्थापनाकडे आहे; म्हणून देयक भरले, तरच वीज मिळेल एवढाच पर्याय सध्या आहे.
प्रांताधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कॉफी शॉप’ नावाचा नवा प्रकार इचलकरंजी परिसरात नव्याने उदयास आला आहे. पोलिसांच्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला. याचे मूळ ‘व्हॅलेंटाईन डे’मध्येच आहे. तरी अशा प्रकारच्या ‘कॉफी शॉप’ला आळा घालावा.
‘श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेड’च्या विशालनगर, पिंपळे निलख येथील शाखेत बनावट कागदपत्रे सिद्ध करून अधिकोषाची २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत घडली आहे.
येथील साधिका कु. माधवी पै या पहिल्याच प्रयत्नात सनदी लेखापालाच्या (सी.ए.ची) अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. दोन ग्रुपमध्ये एकाच वेळी उत्तीर्ण होऊन त्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे. मंगळुरूच्या साधिका सौ. लक्ष्मी पै यांची ती सर्वांत मोठी कन्या आहे.
यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अद्याप अटक का होत नाही, अन्य गुन्ह्यांतील आरोपी सापडतात, नाहीच सापडले तर पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांना पकडतातच. असे असतांना बोठेच्या संदर्भात असे का होत नाही ?