पुणे – महावितरण आस्थापनाची आर्थिक स्थिती सध्या बिकट झालेली आहे. वीजदेयकापोटी अनुमाने ४६ सहस्र कोटी रुपये येणे बाकी आहेत. राज्यात सध्या अडीच कोटी वीजग्राहक आहेत. त्यांपैकी सर्वाधिक १ कोटी ८३ लाख घरगुती वापर करणारे आहेत. शेतीसाठी वीज वापरणारे ५० लाखांवर आहेत. ८० लाख ३२ सहस्र ग्राहकांनी गेल्या १० मासात एकदाही वीजदेयक भरलेले नाही.
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वबळावर उभे रहाणे एवढाच पर्याय आस्थापनाकडे आहे; म्हणून देयक भरले, तरच वीज मिळेल एवढाच पर्याय सध्या आहे.