सातारा येथे शेतकर्‍यांचे आंदोलन

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता बंद करत चक्का जाम आंदोलन केले.

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेची बेकरी उत्पादने, तसेच अन्य उत्पादने यांच्या वेष्टनांवरील हनुमानाचे चित्र काढून टाकावे !

श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्था मर्यादितचे जनरल मॅनेजर यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन

शेतकरी आंदोलनाविषयी कलाकारांनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री  

देहली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी विविध चित्रपट कलाकार आणि क्रिकेट खेळाडू यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी केली जाईल.

जालना येथील २५५ कोटी रुपयांच्या सूक्ष्म सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू

घोटाळे आणि भ्रष्टाचार यांमध्ये राजकारणी अन् प्रशासन यांचा कोणीही हात धरू शकणार नाही, अशी स्थिती असणारा जगातील एकमेव देश भारत !

मीरारोड येथे ६ सिलेंडरच्या स्फोटात १ जण घायाळ

मीरारोड येथील रामनगर परिसरात ७ फेब्रुवारीच्या रात्री पावणे दोन वाजताच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. येथील मोकळ्या मैदानात भारत गॅस आणि एच्पी गॅस यांचे सिलेंडर भरलेले २ ट्रक उभे होते. यातील एका ट्रकमध्ये स्फोट झाला.

देहू येथे येणारे भाविक तीर्थ म्हणून पीत आहेत इंद्रायणीचे दूषित सांडपाणी !

सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे, याकडे कानाडोळा करणारे अधिकारी गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मात्र गणेशमूर्ती विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते, असा कांगावा करतात.

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड

राज्य सरकार येथील कार्यालय दुसरीकडे कसे काय स्थलांतरित करू शकते ?, असा प्रश्‍न उपस्थित करत प्रहार संघटनेने त्यास विरोध केला आहे. कार्यालय स्थलांतरास भाजपने विरोध करून या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून आंदोलन केले.

शरद पवार कधी क्रिकेट खेळले नसतांनाही ते अध्यक्ष होते ! – सदाभाऊ खोत, रयतक्रांती संघटना

शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सचिन तेंडुलकरला सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना ज्या क्षेत्रातले कळते त्यातले त्यांनी बोलावे, असे वक्तव्य केले होते. या संदर्भात सदाभाऊ खोत म्हणाले, शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का ? तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले ? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात रुग्णाला दिले कालबाह्य सलाईन

रुग्णांच्या जिवाशी खेळणारे रुग्णालय प्रशासन !

हितेंद्र ठाकूर यांच्या ‘विवा’ समूहाची ३४ कोटींची मालमत्ता कह्यात

‘विवा’ समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. वसई-विरार येथील जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांची ही मालमत्ता आहे. पी.एम्.सी. अधिकोषातील घोटाळ्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.