सोलापूर – सोलापूर-हसन एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक पद्धतीने पालट करण्यात आले आहेत. सोलापूर विभागातून धावणार्या सोलापूर-सिद्धेश्वर एक्सप्रेसचे डबे सुविधांतर्गत उत्कृष्ट बनवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूर-हसन एक्सप्रेसच्या डब्यांमध्येही नाविन्यपूर्ण सोयी-सुविधा आणि सुशोभिकरण करण्यात आले आहे.
या गाडीला नाविन्यपूर्णरित्या सिद्ध करण्याचे काम सोलापूरच्या यांत्रिक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले आहे. सोलापूर-सिद्धेश्वर एक्सप्रेसनंतर सोलापूर-हसन एक्सप्रेस सोलापूर विभागातील उत्कृष्ट सुविधेत समावेश झालेली दुसरी रेल्वे असणार आहे.