
जुन्नर (जिल्हा पुणे) – शिवनेरी गडावर फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया या तिथीला शिवजयंती सोहळा पार पडला. मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या काळातील सर्व नियमांचे पालन करून शासनाच्या नियमानुसार हा सोहळा साजरा करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. सुनील रासने यांनी सपत्नीक शिवाई देवीची पूजा करून अभिषेक केला. श्री शिवाई माता मंदिर ते शिवजन्मस्थळ सवाद्य छबिना आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने पाळणा म्हटला. शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी पिंपरी पेंढार (तालुका जुन्नर) येथील सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा वेठेकर यांना ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !