
सातारा, ८ एप्रिल (वार्ता.) – एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या अपशिंगे (जिल्हा सांगली) येथील दयानंद साठे यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश यांनी ३ वर्षे सश्रम कारावास आणि ५४ सहस्र रुपये दंड ठोठावला. पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत असतांना तिला साठे यांनी फूस लावून पळवून नेले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. साठे यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला होता. पीडित मुलीचे म्हणणे आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून साठे यांना दोषी ठरवण्यात आले.
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !