परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

जोे साधना करतो, तोच खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’, बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत 9!’

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व

मला दिसणारा किंवा मला जाणवलेला नकारात्मक विचार किंवा एखाद्याविषयीची प्रतिक्रिया एखादी असते’; पण त्याचे निर्मूलन वेळीच न केल्याने त्याची संख्या वाढते आणि तो माझा स्वभावदोष आणखी दृढ होतो.

नोकरी प्रामाणिकपणे करणारे आणि आईची सेवा मनापासून करणारे फोंडा, गोवा येथील श्री. दिलीप नलावडे (वय ६० वर्षे) !

यजमान प्र्रतिदिन कामाला जातांना आणि कामाहून आल्यावर सासूबाईंना नमस्कार करत असत. ते म्हणायचे, ‘‘माझी आई माझे दैवत आहे.’’ त्यांनी कधीच आई-वडिलांचे मन दुखावले नाही.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन

केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असे म्हटले जाते.

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

दर्शन घेऊन घरी येण्यास निघतांना श्री. म्हाळंक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व नीट होईल.’’ तेव्हा ‘जणूकाही परात्पर गुरु डॉक्टरच आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला आश्वस्त करत होते’, असे आम्हाला जाणवले.

लागवडीच्या ठिकाणी असलेल्या घरात देवघर बनवून तिथे प्रतिदिन पूजा करू लागल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती !

प्रतिदिन पूजा करू लागल्यापासून आम्हाला चैतन्य मिळत आहे. लागवडीत सेवा करून थकून आम्ही घरात आल्यावर ‘आमचा थकवा उणावून आम्हाला शक्ती मिळते’, असे आम्हाला जाणवते.

साधना सत्संगातील जिज्ञासूंना देवद, पनवेल येथील सनातनचा आश्रम आणि साधक यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !

आश्रम पहातांना आणि साधकांना भेटतांना मला चैतन्य जाणवत होते.

किती वेळा ग्रंथ वाचले याला महत्त्व नाही, तर त्यातल्या किती ओळी जीवनात अंगीकारता हे महत्त्वाचे !

भलेही एक उतारा (पॅराग्राफ) वाचा किंवा फारतर ४ ओळीच वाचा; पण वाचलेल्या वचनांचे चिंतन-मनन करून त्यांना जीवनात अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर एक ओळही तुम्ही जीवनात अंगीकारली, तर ते वाचन सार्थक होईल.’

‘सनातन’ माध्यम असे कलियुगी अवतारी कार्याचे ।

‘सनातन’ माध्यम असे कलियुगी अवतारी कार्याचे । धरतीवरील हे कार्य वाटते जणू त्रिदेवांचे । ग्रंथरूपाने ज्ञानाचे भांडार उघडले जणू ब्रह्मदेवाचे ।।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

दुकानात कितीही पैसे घेऊन गेलो, तरी कुठल्याही दुकानात आनंद विकत मिळणार नाही. तो स्वतःच (साधना करून) मिळवावा लागतो.