चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारा, ज्याच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, तो चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्यांना सुगंध देते; त्याप्रमाणे असा गुरु प्रभुकार्यासाठी स्वतःला झिजवून जगात सुगंध पसरवतो. असा गुरु वाणीने नाही तर स्वतःच्या वर्तनाने उपदेश देत असतो.