भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला, तर सद्गुरूंची कृपा झाल्याविना रहात नाही. ‘अमुक एक साधना करत जा’, असे सद्गुरूंनी सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलो; पण आपले विचार जर आहे तसेच राहिले, तर भगवंताचे प्रेम येणार कसे ? वस्तूस्थिती पहाता साधनेचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. ‘जे काही होणार ते सद्गुरूंच्याच इच्छेने, त्यांच्याच प्रेरणेने होते’, अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनेचे प्रेम तो भगवंतच देतो, हे आपण विसरून जातो. प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे. फार चिकित्सा करण्याने हानी होते.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)