मराठा समाज निवडणुकीत रोष व्यक्त करील ! – मनोज जरांगे

ते पुढे म्हणाले की, राज्यातील मराठा समाजाच्या मनात खदखद आहे. मराठा समाजाला आरक्षण देतो, असे सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी धोका दिला. सरकारने सगेसोयर्‍याची अधिसूचना काढली; मात्र त्याची कार्यवाही केली नाही.

जिल्ह्यातून १ अपक्ष उमेदवार उभा करण्याचे मराठ्यांना आवाहन !

मी राजकारणात जाणार नाही. निवडणुकीला उभा रहाणार नाही; पण मराठा मतपेढी काय आहे, ती ताकद दाखवून देईन.

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

सगेसोयरे अधिसूचनेची कार्यवाही न केल्यास पूर्ण पराभव होईल ! – मनोज जरांगे पाटील यांची सरकारला चेतावणी’

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ९ मार्च या दिवशी पिंपळवाडी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. सरकारच्या विरोधात ९०० एकर भूमीवर भव्य सभा घेण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे

मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती ही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील !

मराठा आरक्षणानुसार कोणतीही नोकर भरती किंवा शैक्षणिक दाखले दिल्यास त्याविषयीचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.

Goa Reservation For Election : लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणासंबंधी अधिसूचना काढा ! – ‘मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर एस्.टी.’ची मागणी

गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभेत आरक्षण मिळावे, यासाठी गोवा सरकार सातत्याने पाठपुरावा करत असल्याने केंद्राने हा निर्णय घेतला आहे. गोव्यात आजवर अनुसूचित जमातींच्या लोकांची संख्या अल्प असल्याच्या कारणाखाली त्यांना राजकीय आरक्षण दिले जात नव्हते.

मनोज जरांगेंसह २०० जणांवर गुन्हा नोंद !

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणी मनोज जरांगेंसह २०० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी १ गुन्हा नोंद !

बीड येथे विनापरवाना फेरी काढून ‘जेसीबी’ यंत्राने फुले उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर १२ जण यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील १० दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे नोंद झाले आहेत

मराठा समाजाला आरक्षण दिल्याविषयी सकल मराठा समाजाकडून शासनाचे अभिनंदन !

मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपूर्वी मराठ्यांना आरक्षण द्यावे ! – मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.