मुंबई – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यासाठी केलेल्या दिवाणी रिट याचिकेवर निर्णय देतांना मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. १२ मार्च या दिवशी या याचिकेवर सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला येत्या १० दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा घेतलेल्या निर्णयाला अधिवक्ता सदावर्ते यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.